भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांच्या नाव नोंदणी करीता विशेष अभियान राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

             


पुणे, : मतदार यादी शुद्धीकरणासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विधानसभा मतदार संघात विशेष अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

            भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी मतदार यादी शुद्धीकरण महत्त्वाचे आहे. पुणे जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोग व मुख्य निवडणुक आयुक्त यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणी वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

            मतदारांचा एकुण सहभाग वाढविण्यासाठी लक्षित प्रयत्नासह विविध माध्यमांद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत एकुण ७९ लाख ५१ हजार ४२० इतके मतदार समाविष्ट आहेत. पुणे जिल्ह्याची  एकुण अंदाजित लोकसंख्या १ कोटी ८ लाख आहे. त्यामुळे मतदार नोंदणी न झालेल्या व्यक्ती पर्यंत पोहाचणे हे निवडणूक विभागाचे कर्तव्य आहे. त्याअनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

                भारत निवडणुक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केली असून आता वर्षातून चार वेळा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोंबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन आगामी काळात पुणे जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

            मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदारांमध्ये जनजागृती करून भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची नोंदणी वाढविण्यासाठी मतदार यादी अद्ययावत  मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या मतदारसंघातील भटक्या व विमुक्त जमातीमधील नागरिकांसाठी शिबिर आयोजीत करावीत. 


सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी स्वतः उपस्थित रहावे. तसेच त्यांच्या अधिनस्त अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व इतर कार्यालयीन कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी. सर्व ठिकाणी सोयीच्या तारखा आणि ठिकाणे ठरवावीत. योग्य पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

0000

Followers