आंबेडकरी चळवळ गतिमान करणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान
पुणे: प्रतिनिधी- सामाजिक क्रांतीचे अग्रणी महात्मा फुले यांचे सहकारी आंबेडकरपूर्व कालखंडातील आद्य समाजसुधारक सत्यशोधक गोपाळबाबा वलंगकर यांनी१८८८ साली लिहिलेल्या व रावढळ येथून प्रकाशित केलेल्या विनंतीपत्र या
पुस्तिकेस यावर्षी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहास संशोधक डॉ. प्रेम हनवते यांनी संशोधीत व संपादित केलेल्या आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या विनंतीपत्र या दुर्मिळ पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ ते ३.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,मालधक्का चौक, पुणे येथे संपन्न होणार आहे. तसेच महार रेजिमेंट स्थापना दिनाचे औचित्य साधून आंबेडकरी चळवळीला गतीमान करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या मान्यवरांना गोपाळबाबा वलंगकर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी अॕड जयदेवराव गायकवाड, (माजी आमदार) हे आहेत. प्रमुख पाहुणे मा. सुनिल वारे, (महासंचालक, बार्टी) पुणे डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, (विभागप्रमुख बार्टी) पुणे, डॉ. श्रध्दा कुंभोजकर, (विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) पुणे, प्रा. डॉ. वि.ना. कदम (संचालक, यमुना ज्ञानविज्ञान संस्कृतिपीठ उमरखेड) डॉ. विजय माने, (कृषि शास्त्रज्ञ, अधिष्ठाता डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) अकोला, व्ही.एच. हनवते, (संस्थापक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान) यवतमाळ, प्राचार्य डॉ. गौतम बेंगळे (शैक्षणिक विचारवंत) पुणे, शेखर जावळे, (सामाजिक कार्यकर्ता) पुणे, दिपक जाधव, (रावढळ) महाड यांच्या उपस्थितीमध्ये दिवंगत बबनराव कांबळे, संपादक, (दैनिक वृत्तरत्न सम्राट) मुंबई, दिवंगत सुधाकर खांबे, (संस्थापक महार रेजिमेंट राष्ट्रीय संग्रहालय) पुणे, सुदामराव पवार, (संस्थापक, नालंदा बुध्दविहार सणसवाडी) पुणे,वसंतराव साळवे (आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते) अंकल सोनवणे,(आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) धम्मभूषण ॲड. आपाराव मैंद, (ज्येष्ठ विचारवंत) यवतमाळ, सत्यशोधक के.ई.हरिदास, (ज्येष्ठ विचारवंत) संभाजीनगर, सुबोध मोरे, (सांस्कृतिक चळवळीतील विचारवंत) महाड, रमेश (नाना) शिंदे, (आंबेडकरी संदर्भ साहित्याचे संशोधक व संग्राहक) मुंबई, सुभेदार मेजर तानाजी साळवी, (कॅप्टन ८महार रेजिमेंट) महाड, बाळासाहेब सोनोने (विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते) यांना गोपाळबाबा वलंगकर राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार २०२३ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यवतमाळ आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. फुले आंबेडकरी चळवळीस गतीमान करण्यासाठी ज्या अनुयायांनी योगदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सहकुटूंब मित्र परिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख डॉ. सुहास नाईक, मानसीताई वानखेडे, अध्यक्ष स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांनी केली असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख रामदास लोखंडे यांनी दिली आहे.