सासवड - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थांनी जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्ताने शहरातून जागृती रॅलीचे नियोजन केले. यानिमित्त डेंग्यू, मलेरियाच्या साथीबाबत जनजागृती करण्यात आली.
पुणे जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशियेशनचे सदस्य धैर्यशील शिंदे, स्वीकृत सदस्य बाळासाहेब भिंताडे, पुरंदर तालुका अध्यक्ष सुकुमार नाझिरकर, उपाध्यक्ष व माजी नगरसेवक नंदू जगताप, हरगुडेचे सरपंच भूषण ताकवले, सचिव संतोष जगदाळे, खजिनदार स्वप्निल पवार, संतोष कुंभार, अरुण खेनट, दिपक काळे, सागर सस्ते आदींच्या उपस्थितीत रॅलीचे उदघाटन झाले.
जागतिक फार्मसी दिनानिमित्त महाविद्यालयातील पीएच.डी प्राप्त केलेले अध्यापक डॉ अमोल काळे, डॉ वैभव शिळीमकर आणि डॉ प्रज्ञा निलेश जगताप यांचा पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ राजश्री चव्हाण, उपप्राचार्य डॉ एस जे पवार व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
"निरोगी जगासाठी फार्मसी क्षेत्राचे एकत्रित कार्य" ही या वर्षाची थीम आहे. जगभरातील आरोग्यावर फार्मसीचा सकारात्मक प्रभाव प्रदर्शित करणे, व्यवसायातील एकता आणखी मजबूत करणे, जगाच्या व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या थीम उद्देश आहे.
फार्मसिस्ट त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून वैद्यकीय जगाला चांगल्या स्थानी घेऊन जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. औषधांविषयी निर्णय घेणे, विशेषतः ड्रग इंटरॅकशन्स, कॉंट्राइंडिकेशन्स आणि औषधांचे क्लिनिकल उपयोग यामधे फार्मसिस्ट मध्यवर्ती भूमिका बजावतात. औषध विकसित करण्यापासून त्याचे रुग्णापर्यंत वितरण करण्यापर्यंत फार्मसी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे आणि भविष्यातही राहील असे सुखदेव नझिरकर यांनी सांगितले.