मुंबई, : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अवर सचिव रविंद्र पेटकर, विभागाचे कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.