संघटनात्मक काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये महत्त्व :- एहसान खान

                                सासवडमध्ये " बुथ जोडो युथ जोडो " बैठक संपन्न



                सासवड :- काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून युवक काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे बदल झाले आहेत. यापुढे पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महत्त्व राहणार आहे. पक्ष संघटनेत महिलांचा समावेश करावा, तळागाळातील आणि विविध जाती धर्मातील युवकांना संघटनेत सहभागी करून एकजुटीने काम करणे आवश्‍यक असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान यांनी व्यक्त केले.

  खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या युवक काँग्रेसच्या " बुथ जोडो युथ जोडो " या अभियानांतर्गत सासवड येथे मंगळवारी ( दि २६ ) पुरंदर - हवेली विधानसभा युवक काँग्रेस कमिटीची बैठक झाली. यामध्ये प्रदेशचे प्रभारी खान यांनी, पक्षसंघटना वाढीबाबत तसेच आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अक्षय जैन, युवक जिल्हाध्यक्ष महेश टापरे, प्रदेश समन्वयक कुलदीप धनवट, उमेश पवार, भोरचे निलेश पवार, बारामतीचे धवल गाडे यांनी मार्गदर्शन केले.

   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "बुथ जोडो युथ जोडो" अभियान राबविण्यात येईल असे पुरंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, मयूर मुळिक, सोमेश्वरचे संचालक तुषार माहूरकर, विकास इंदलकर, नितीन वायकर, दत्ताराजे शिंदे, चंद्रकांत बोरकर, सनी खेडेकर, रुपेश धुमाळ, यश जगताप, तुषार खळदकर, स्वप्नील शिवरकर, ओंकार दळवी, अमर गायकवाड, चांगदेव कुंजीर आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष माऊली यादव यांनी प्रास्ताविक केले तर सासवड शहर अध्यक्ष सागर जगताप यांनी आभार मानले. 

Followers