पुणे, : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे. पहिला सोमवार २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मंगळवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही कळविण्यात आले आहे.