पुणे - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत होलार समाज यांचेकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी आणि इतर बाबींवर मार्गदर्शनपर एक दिवसीय विभागीय स्तरावर कार्यशाळेचे आयोजन मा . सुनिल वारे, महासंचालक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या महाराष्ट्र राज्य व मा.इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय भवन नाशिक येथे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, विभाग नाशिक,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा नाशिक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा नाशिक यांच्या सहकार्याने, दिनांक २६ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे होलार समाजातील समाज बांधव, होतकरू तरुण-तरुणी यांचे करिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जिल्हा नाशिक च्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली बाविस्कर , अपर जिल्हाधिकारी निवड श्रेणी तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जिल्हा नाशिक तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. बबन काकडे, उपविभागीय अधिकारी, महसुल उप विभाग बागलाण, जिल्हा नाशिक,श्री. राकेश पाटील, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,जिल्हा नाशिक, बार्टी मुख्यालय प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभागचे विभाग प्रमुख श्री अनिल कारंडे, श्री देविदास नांदगावकर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा नाशिक, श्री चौधरी महिला व बालविकास विभाग अधिकारी, श्री संतोष शिंदे,जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नाशिक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यशाळेला लाभली.
या कार्यशाळेचे आयोजन करण्याकरिता मार्गदर्शन व सहकार्य श्री. माधव वाघ, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नाशिक यांचे लाभले.
जात प्रमाणपत्र व त्याकरिता आवश्यक कागदपत्रे यावर मार्गदर्शन करताना श्री काकडे म्हणाले की, जात प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्वी प्रत्यक्ष तहसील मध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती, आता शासनाने आपले सरकार, महा-ई-सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र,सेतू यासारख्या विविध सहजतेने उपलब्ध होणाऱ्या सोयी सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत. याचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा. याचबरोबर जात प्रमाणपत्र करिता आवश्यक दस्ताऐवज कोणते हे त्यांनी स्पष्ट केले तसेच उपस्थित होलार समाज बांधवांच्या जात प्रमाणपत्राविषयीच्या प्रश्न- अडचणी यांचे शंका निरसन केले.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक, सामूहिक व सामायिक लाभाच्या योजना याविषयी श्री नांदगावकर यांनी माहिती दिली. याबरोबर महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना व त्याचे लाभ तसेच कायदेशीर मदत याविषयी माहिती श्री. चौधरी यांनी उपस्थित नागरिकांना दिली. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ जिल्हा नाशिक चे जिल्हा व्यवस्थापक श्री. संतोष शिंदे यांनी महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजना याविषयी अधिक माहिती दिली. कौशल्य विकास विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या तरुण तरुणींसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती टाटा स्ट्राइव्ह प्रतिनिधी श्री. चांदोरकर यांनी दिली.
या कार्यशाळेत होलार समाजातील समाज बांधवांसोबत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तर होलार समाजाचे प्रतिनिधी म्हणून व ज्यांचे या कार्यशाळेला महत्त्वाचे सहकार्य लाभले असे श्री. नामदेवराव अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करताना होलार समाजाची सद्यस्थिती यावर मांडणी करताना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आणि या कार्यशाळेतून समाजाला निश्चितपणे दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली आणि बार्टीचे महासंचालक सन्माननीय श्री. सुनील वारे यांचे या विशेष कार्यशाळांचे विभाग स्तरावर आयोजन करण्यासाठी दिलेल्या मान्यतेसाठी आणि प्रत्यक्ष आयोजनासाठी सर्व होलार समाज बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती बाविस्कर मॅडम यांनी अनेक संदर्भ देऊन जात प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणी आणि याचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी भाष्य करताना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील लोकांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि पाठपुरावा करणे, त्याचबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे कसे मिळवता येईल याविषयी अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन तर केलेच याचबरोबर त्यांनी नाशिक विभागात जात प्रमाणपत्रांपासून जे अद्याप वंचित आहेत, त्यांचे करिता विशेष अभियान तहसील व प्रांत कार्यालयामार्फत आवर्जून राबविण्यात यावे यावर समितीमार्फतही विशेष शिबीरे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता महसूल विभाग, बार्टी आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून तालुका व गाव पातळीवर देखील याबाबत विविध माध्यमातून जनजागृती तसेच प्रत्यक्ष शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे हे आवर्जून नमूद केले आणि उपस्थित नागरिक यांचे अडीअडचणी आणि शंका यांचे निरसन केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमांना पुष्पअर्पण व दीप प्रज्वलन करून आणि भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. श्री . शुद्धोधन तायडे, समतादुत यांनी उद्देशिका वाचन केले. कार्यशाळेच्या सुरुवातीस श्री अनिल कारंडे, उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख, प्रशिक्षण व कौशल्य विकास विभाग यांनी आनापान सत्र घेऊन त्याचे महत्त्व विशद केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती प्रतिज्ञा दाभाडे, प्रकल्प अधिकारी, समतादुत प्रकल्प, जिल्हा नाशिक आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत इंगळे समतादूत यांनी केले तर या कार्यशाळेचे आभार व बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजना याविषयी अधिक माहिती श्री. नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समन्वय विभाग आणि प्रशिक्षण विभाग यांनी दिली.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता होलार समाजाचे सर्व स्तरावरील राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आणि समतादुत प्रकल्प, नाशिक, समाज कल्याण कार्यालय, नाशिक ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय, नाशिक तसेच बार्टी मुख्यालय प्रशिक्षण विभाग कार्यालय अधिक्षक श्रीमती प्रज्ञा मोहिते यांचे मार्गदर्शन, श्री महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक, कौशल्य विकास विभाग, श्री सचिन नांदेडकर, प्रकल्प अधिकारी, सचिन गिरमे, लिपिक, श्रीमती सुनिता कदम व श्री नितेश गायकवाड, संशोधन सहाय्यक, श्रीमती उज्वला धेंडे, लिपिक व श्री गणेश तुपधर, सहाय्यक, श्री. रविराज सुरवाडे वाहन चालक यांचेही सहकार्य लाभले.