सासवड - शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई या दोन्ही विद्यालयांनी आज लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले. होते. या मिरवणुकीच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीम जहांज पथक यांचे अतिशय सुंदर असे प्रदर्शन केले.
*आजच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाने 'आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष ' ही थीम डोळ्यासमोर ठेवून लोकांमध्ये मिलेट बद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाने जपलेली पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची परंपरा. पर्यावरणाचे भान ठेवून दरवर्षी पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश विसर्जन केले जाते.
" हर्ष-आनंद होईल बाप्पा तू घरी येताना
डोळे पाणवतात तुला निरोप देताना "
लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी हे देखील उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सहभागी झाले होते.
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती आनंदी काकी जगताप. सहसचिव माननीय श्री डी. एन गवळी सर, व्यवस्थापक श्री. कानिफनाथ अमराळे सर, माननीय श्री.रवींद्र पंथ जगताप सर , विद्यालयाच्या प्राचार्य रेणुका सिंह मर्चंट मॅडम, सीबीएसईच्या प्राचार्या ज्योती क्षीरसागर सागर मॅडम, उपप्राचार्य सौ. सुषमा रासकर मॅडम, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सौ.उज्वला जगताप मॅडम तसेच पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. स्वाती जगताप मॅडम आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शविली.