विद्यार्थ्यांनी बार्टीच्या योजनांचा लाभ घ्यावा ; सुनिल वारे

                


                पुणे  -
डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी  आपल्या समाजाची प्रगती  केवळ शिक्षणामुळेच  होऊ शकते हे ओळखून त्यांनी मोठ्या कष्टाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून  अनेक महाविद्यालयाची उभारणी केली  डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत आपण शिक्षण घेत आहोत याचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटला पाहिजे मि सुध्दा सिद्धार्थ महाविद्यालय , मुंबई  या कॉलेजचा  विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी   आपले ध्येय निश्चित करून उच्च शिक्षण घ्यावे  तेव्हाच ते  आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतील असे प्रतिपादन बार्टी संस्थेचे महासंचालक मा.  सुनिल वारे यांनी डॉ  आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय , येरवडा , पुणे महाविद्यालयाच्या ३९ व्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले .

          


 बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी   डॉ.  बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चा  वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य डॉ  डी जी देशकर,  (उपाध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई )  डॉ पांडकर एम एम, प्र प्राचार्य  (डॉ आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय येरवडा, ) पुणे , विवेक बनसोडे (प्रदेशअध्यक्ष रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश ) आदी मान्यवर उपस्थित होते.

                यावेळी बोलताना मा.  सुनिल वारे म्हणाले की  बार्टी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचाराचा प्रसार व प्रचार करणारी  तसेच संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था असून  बार्टी संस्थेच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयबीपीएस कौशल्य विकास  रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण व उपक्रम राबविण्यात येतात  बार्टीच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि महापुरुषांच्या विचाराचे आचरण आपण करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

          


 माजी प्राचार्य डॉ डी जी देशकर, प्राचार्य पांडकर एम एम यांनी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रांतीसुर्य महात्मा फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. पांडकर एम एम यांनी पुस्तक व गुलाब पुष्प देऊन केले. याप्रसंगी प्राध्यापक,  कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Followers