सासवडला जैन धर्मियांचे पर्युषणपर्व - उपवास तपस्या साजरे; दिगंबर जैन धर्माचे दहा दिवसांचे दशलक्षण पर्वही सुरु

           


 सासवड,  : येथील जैन धर्मियांचे पर्युषणपर्व नुकतेच साजरे झाले. सासवड (ता.पुरंदर) नगरीतील धान्य बाजारपेठेतील श्री. कुंथुनाथ जैन मंदिरात या जैन धर्मियांचे पर्युषणपर्वानिमित्त भव्य सजावट केली होती. तसेच उपवास तपस्या मोठ्या उत्साहात करण्यात आली. शिवाय दिगंबर जैन धर्माचे दहा दिवसांचे दशलक्षण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमीपासून  सुरु झाल्याचेही यानिमित्ताने सांगण्यात आले. 

            जैन धर्मियांचे पर्युषणपर्वानिमित्त एकुणच धर्मियांमध्ये मोठा उत्साह व उल्हास होता. यानिमित्ताने झालेल्या भगवान महावीर जन्म वाचनाचा लाभ यंदा बाबुशेठ कोठारी यांनी घेतला. तर भगवान महावीर स्वामी पाळणा लाभ विवेक पकाशेठ सोळंकी यांनी घेतला. नित्यदिनी पझालपूजा, स्नानपूजा तसेच भक्ती, आंगी विधीचा मान कुलदिप शर्मा व महिला मंडळाने घेतला. संवत्सरी लाभ महेंद्र अोसवाल परीवाराने घेतला. पार्श्वनाथ भक्ती संगीत मंडळाचे कपिल रमेश अोसवाल, रोमित सोळंकी, हितेश सोळंकी आदींनी जैन धर्मियांचे पर्युषणपर्वानिमित्त विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच सोहळ्याचे नियोजनही केले. यानिमित्तानेच भगवान महावीर पुस्तक वाचनाचा लाभ विकासशेठ सोळंकी यांनी घेतला. आठ उपवास तपस्या सुजल सोळंकी, प्रितम सोळंकी, सोनिया सोळंकी, पुर्वी कमलेश सोळंकी, रत्नराज सोळंकी यांनी केली. तर तीन उपवास तपस्या सिमा सोळंकी, मोनाल दिनेश सोळंकी, अंकित सोळंकी, हेमलता र. अोसवाल, वैशाली शहा, कमलेश अोसवाल आदींनी केली., अशी माहिती संघटनेतर्फे अशोक अोसवाल यांनी दिली. दिगंबर जैन धर्माचे दहा दिवसांचे दशलक्षण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमीपासून  सुरु झाल्याचीही माहिती यानिमित्ताने वैभव खलसे, प्रशांत गिते, धनपाल पाटील यांनी दिली. हे पर्व भाद्रपद पौर्णिमेपर्यंत हे पर्व चालेल.   

Followers