सामाजिक उपक्रम सूरू करून के.खाजाभाई बाग‌वान यांचे कार्य पुढे नेणार :- आमदार संजय जगताप

             


सासवड ; सासवड नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बाग‌वान यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले.खाजाभाई म्हणजे चालती बोलती नगर पालीका होती सासवड शहराच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. के.खाजाभाई यांचे कार्य पुढे नेणार यासाठी सासवड नगर पालिका.साहित्य परिषद सासवड.खाजाभाई मित्रपरिवार यांचे सहकार्य घेऊन सामाजिक उपक्रम सूरू करावे असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले

            खाजाभाई बागवान यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सासवड नगर पालिकेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार संजय जगताप यांनी हे आवाहन केले अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते होते सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन उभे करणे अशा विकासकामात कै.खाजाभाई बागवान मोलाचे सहकार्य होते असे विजय कोलते यांनी सांगितले या शोकसभेत माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामआप्पा इंगळे ॲड.प्रकाश खाडे,भाजपचे शहराध्यक्ष संतोष एकनाथ जगताप शिवसेना उबठा गटाचे अध्यक्ष अभिजित जगताप, राष्ट्रवादीचे महेश जगताप, बाळासाहेब कुलकर्णी, मोहन चव्हाण, संजय पवार,माऊली गिरमे, ज्ञानेश्वर जगताप,हरुणभाई बागवान, मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण,आयत आशपाक बागवान इत्यादींनी श्रद्धांजली अर्पण केली. हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.आशपाक बागवान यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, नगरसेवक अजित जगताप, विजय वढणे,शरद बोबडे.पापाभाई बागवान व नगरपालिका कर्मचारी, शिक्षण मंडळाचे कर्मचारी  उपस्थित होते.संदीप टिळेकर यांनी नियोजन  केले 



Followers