वाघोलीत विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू



                लोणीकंद : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. उमंग होम प्राईमो सोसायटीची मिरवणूक सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.

गणेश बाळकृष्ण दळवी (वय 44 वर्षे) ( रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट वाघोली. ) असे तरुणाचे नाव आहे. उमंग होम प्राईम सोसायटी गणेश मंडळची सायंकाळी मिरवणूक सुरू झाली. सातच्या दरम्यान बँजो समोर नाचत असताना दळवी अचानक बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हा मृत्यू हृदयविकाराचा तीव्र झटक्याने झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीमागे आई- वडील, पत्नी व दोन मुले असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

आकस्मित मृत्यूची नोंद

दळवी यांच्या आकस्मित मृत्यू मुळे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. लोणीकंद पोलीस ठाण्यातही आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी सांगितले. 

Followers