सासवडच्या शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

 


                सासवड :- सकल मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गातून ५० मध्येच मराठा कुणबी म्हणून आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुरंदर तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरूवार ( दि २६ ) पासून सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू करण्यात आले आहे. 

                  यापुर्वीही सासवडच्या शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सलग १०० दिवस ठिय्या आंदोलन करून मराठा आरक्षण मागणीची ज्योत तेवत ठेवण्यात आली होती. आताही मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक कामांत आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे समन्व्यकांनी सांगितले.

                  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या मुलगी मुलींच्या शिक्षण व नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक भागात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण, मराठा - कुणबी म्हणून ५० टक्के च्या आत ओ बी सी प्रवर्गातूनच कायम स्वरुपी मिळण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे तहसीलदार पुरंदर यांना करण्यात आली.


Followers