नागपुर -- बार्टी संस्थेच्या वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन-- ते --दिक्षाभुमी नागपुर पर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ संध्या नारखडे, कार्यालय अधिक्षक बार्टी , नितिन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, अनिल वाळके, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी, शितल गडलिंग, सुनिता झाडे, दिनेश बराई , सरिता महाजन, नागेश वाहुरवाघ, सतिष सोमकुंवर, आकाश कु-हाडे, रामदास लोखंडे, राहुल कवडे, यांच्यासह बार्टी संस्थेतील योजनांचा लाभ घेणारे विद्यार्थी समतादुत आदी उपस्थित होते..