बहुजन विकास परिषदेचा केज येथे रविवारी भव्य राज्यव्यापी संकल्प मेळावा



बीड (प्रतिनिधी)  रमेश तात्या गालफाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून सर्व जातधर्मीयांना सोबत घेऊन राज्यभरातील बहुजन समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश गालफाडे यांनी  स्थापन केलेल्या बहुजन विकास परिषद , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पहिल्या राज्यव्यापी संकल्प मेळाव्याचे रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी केज या शहरात आयोजन करण्यात आले आहे.

                  रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. केज येथील जय भवानी चौकातील मुक्ताई फंक्शन हॉल येथे आयोजित संकल्प मेळाव्याचे उद्घाटन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन  बजरंग सोनवणे यांच्या हस्ते होणारा आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या मेळाव्यास बीड जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ .योगेश क्षीरसागर व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती तर स्वागताध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई गुंड यांची उपस्थिती लाभणार आहे.

               या संकल्प मेळाव्यास, बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत भालेराव, शंकर तडाके, पुण्यातील माजी नगरसेवक, डॉ .भारत वैरागे, दैनिक लोकटाइम्सचे मुख्य संपादक राजेंद्र दणके, मुंबईचे माजी सीईओ सुदाम धुपे , बहुजन किसान पक्षाचे अर्जुनराव गालफाडे, गजानन पगारे कैलास वाकळे, रवींद्र शिरसाट महादेव लांडगे, मनोहर कसबे, प्रकाश बोरसे, अशोक साठे, बापूसाहेब कसबे दिनकर घुगे, औरंगाबादचे डॉ. सांबाळकर, उस्मानाबादचे माजी जि. प. सदस्य दिलीप तेलंग, बारामतीचे सागर गायकवाड, शिर्डी येथील निलेश सरवदे आदी मान्यवरांसह राज्यभरातील सुमारे ३६ जिल्ह्यांमधून विविध पक्ष संघटनांचे बहुजन समाजासाठी शहर,जिल्हा, तालुका व गाव पातळीवर  नेतृत्व करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश गालफाडे व संयोजक रमेश पाटोळे  यांनी दैनिक लोकटाइमशी बोलताना सांगितले.

                 सामाजिक कार्यकर्ते रमेश गालफाडे यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून राज्यभरातील बहुजन समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. विशेषत: कोरोना काळात गालफाडे प्रतिष्ठान मार्फत केलेले कार्य उल्लेखनीय असून बहुजन समाजाच्या हितरक्षणासाठी राज्यभरात त्यांनी निर्माण केलेले बहुजन कार्यकर्त्यांचे जाळे अधिक विस्तारित होत आहे. प्रतिष्ठानच्या कार्याला आता चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे म्हणूनच बहुजन विकास परिषदेची स्थापना केली असल्याचे सांगतानाच रमेश गालफाडे यांनी या राज्यव्यापी संकल्प मेळाव्याद्वारे पुढील काळात बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी, शासन दरबारी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.

         ‌.

Followers