सासवड प्रतिनिधी -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्यासाठी एकुण ३९ महीला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले असुन एक एप्रिल पासून हे वाटप करण्यात आले असून सुमारे ४७ लाख १० हजार रुपये रोख वाटत करण्यात आले आहे अशी माहिती हनुमंत मचाले यांनी दिली
महीलांना नवीन उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाते नगण्य व्याजदरात हे कर्ज देताना महिला बचत गटाच्या माध्यमातून ताळेबंद पाहीला जातो बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल देखील पाहून योग्य बचत गटांना हे कर्ज वाटप केले जाते सासवड शाखेच्या माध्यमातून. १ एप्रिल पासून ३९ महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले आहे
पारगाव येथील जय योगेश्वर महीला बचत गटाला आज मंगळवार रोजी आ संजय जगताप यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले आ संजय जगताप यांनी सांगितले की महीला बचत गट सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदैव तत्पर असुन बचत गट स्थापन झाल्या पासून ते आज पर्यंत त्या बचत गटाची टाळे बंदी बघुनच कर्ज वाटप करण्यात येते
या वेळी उपस्थित आ संजय जगताप सासवड शाखा अधिकारी हनुमंत मचाले जयश्री शिंदे अनिल उरवणे यांच्या सह बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या