पिंपरी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राजसाहेब राजापूरकर व पिंपरी चिंचवड ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत,असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष विशाल क्षीरसागर, युवराज निलवर्ण व इतर मान्यवर उपस्थित होते.
नियुक्त पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजसाहेब राजापूरकर म्हणाले "पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे त्या ठिकाणी कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत . येत्या काळामध्ये शरद पवार साहेबांचे विचार प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम शहराध्यक्ष भाई विशाल जाधव करत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून भोसरी विधानसभेमध्ये येत्या काळात संतोष माळी काम करतील. २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी ओबीसी मेळावा शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे."
"पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी काम करत आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी केलेले काम व मतदार संघातील अनुभव दांडगा असल्या कारणामुळे आज माझी भोसरी विधानसभा ओबीसी विमागच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे . त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो."असे संतोष माळी म्हणाले