सासवड ( प्रतिनिधी ) :- दिवंगत लोकनेते सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या आणि सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदिकाकी जगताप अध्यक्ष असलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचा ३५ वा वर्धापनदिन गुरुवारी ( दि १९ ) सासवड येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्व चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पतसंस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, संचालक अंकुशराव जगताप, आनंदराव घोरपडे, कल्याणराव जेधे, सुनील खोपडे, डॉ विनायक खाडे, बाळासाहेब काळाणे तसेच जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र खैरे, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, युवकचे गणेश जगताप, निरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर, संभाजी काळाणे, विठ्ठलराव मोकाशी, अॅड विजय भालेराव, चेतन महाजन, दत्ताराजे शिंदे, सौरभ जाळींद्रे तसेच सरव्यवस्थापक अनिल उरवणे, व्यवस्थापक सतिश शिंदे, एच आर हरीभाऊ शिंदे, भाऊसाहेब कापरे यांसह सभासद, ठेवीदार, हितचिंतकांनी उपस्थिती दाखवली.
स्व चंदुकाकांवर सर्वांनी विश्वास ठेवून संस्था वाढवल्या त्याचप्रमाणे यापुढेही सभासदांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेच्या वाढीसाठी साथ आणि आशीर्वाद द्यावेत असे आवाहन अध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांंच्या वतीने आमदार संजय जगताप यांनी केले. ३० सप्टेंबर २०२३ अखेर संस्थेकडे २९९ कोटी ६८ हजार रुपयांच्या ठेवी, २५ कोटींचे अधिकृत भागभांडवल, ३ कोटी ४५ लाख रुपयांचा राखीव निधी, ४ कोटी ४३ लाखांची स्थावर मालमत्ता, ७० कोटी २० लाखांची गुंतवणूक, २२५ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वाटप, ५२५ कोटींचा व्यवसाय, सतत नफ्यात आणि ऑडिट वर्ग " अ " आहे. संस्थेच्या १३ शाखांपैकी ९ शाखा स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असून पतसंस्थेचे सहकारी बँकेप्रमाणे कामकाज चालू आहे. सर्व शाखांमध्ये विजबिल भरणा केंद्र असून सर्व ग्राहकांच्या जलद सेवेकरीता संस्थेमध्ये लवकर सीबीएस कार्यप्रणाली कार्यान्वित होत असल्याचेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले.