सत्यशोधक बहुजन आघाडीचा पुण्यात उद्या २१ वा वर्धापनदिन मेळावा



                पुणे (प्रतिनिधी) सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा 21 वा वर्धापन दिन मेळावा रविवार 29 ऑक्टोबर रोजी पुण्यात सिंहगड रोड वरील दांडेकर पूल जवळील साने गुरुजी स्मारक येथील बॅरिस्टर नाथ पै हॉलमध्ये सायं ५.३० वा. संपन्न होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी सांगितले.

           या वर्धापन दिन मेळाव्याचे उद्घाटन बहुजन कष्टकऱ्यांचे नेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात बेंगलोर येथील आयकर आयुक्त डॉक्टर कैलास गायकवाड प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

              यावेळी नायब तहसीलदार नाथाची सगट, महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. शारदाताई वाडेकर, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त श्री. आव्हाड, नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात, ज्येष्ठ आंबेडकरी नेते अंकल सोनवणे, राज्याच्या पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे, दैनिक लोकटाइम्सचे मुख्य संपादक राजेंद्र दणके, निवृत्त पोस्ट अधिकारी कालिदास कांबळे, ज्येष्ठ नेते ॲड. मोहन वाडेकर, मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक शुभ लोंढे, इतिहास संशोधक सुहास नाईक, संजय सोनवणे , वसंत साळवे, रवींद्र झेंडे, नितीन सोनवणे, शाम चंदनशिव, निलेश वाघमारे, रवींद्र भिंगारे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे निमंत्रक व संपर्क प्रमुख नागेश गायकवाड यांनी सांगितले.

Followers