पुणे प्रतिनिधी- मंगळवार पेठ वजन काटा जवळ कॉलनी नंबर दोन येथे स्वर्गीय संजय भाऊ खुडे प्रतिष्ठान तर्फे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिष्ठान तर्फे १९९३ पासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवा दरम्यान विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात असल्याचे आयोजक विजय खुडे यांनी सांगितले. प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रतिष्ठान तर्फे नारीशक्तीस साडीवाटप करून महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर वेळेकर ,उपाध्यक्ष कपिल लोंढे ,आयोजक विजय खुडे, सचिन कांबळे, कुमार वेळेकर, गणेश आरडे, अजय खुडे, सिद्धू कांबळे, मयूर कुचेकर, आकाश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्र उत्सवा दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रास दांडिया, भजन आरती, आधी कार्यक्रमांना महिला वर्गासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीच्या मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.