पनवेल (प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे, त्यामुळेच ते समाजोपयोगी उपक्रमे राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज (दि. ०८) खांदा कॉलनी येथे काढले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्ताने खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर यशस्वीपणे पार पडले. या १५ व्या या महाशिबिराचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, आम्ही महाविद्यालयात असल्यापासून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव सतत ऐकत असायचो. माणसाकडे कितीही पैसा असू दे भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही त्यामुळे ठराविक रेषेपर्यंत पैशाला महत्व आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा प्रामाणिकपणे आयुष्यभर लोकं जोडण्याचे आणि लोकांची सेवा करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करत असतात म्हणूनच त्यांच्या नावाला शेठ हे नाव आदराने जोडले गेले आहे. जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने समाजाची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर आहेत. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे से
औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन, तसेच जे. जे. हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ, भारती विद्यापीठ खारघर, मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचे एकूण ५३६ वैद्यकीय तज्ञ् व त्यांचे सहकारी, महाशिबीर यशस्वी करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या ३५ कमिट्यांचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, स्वयंसेवकांचे योगदान लाभले.