पुणे -- नाशिक येथे त्रिरश्मी लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकाच्या परिसरात अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ऐतिहासिक महाबोधीवृक्ष फांदी रोपण महोत्सव भिखु संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी डॉ.भारती पवार यांनी संबोधित करतांना सांगितले की सम्राट अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नाशिकमध्येच श्रीलंकेतील अनुराधापुरच्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले आहे. या महाबोधीवृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असून ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे भगवान बुद्धांचे ज्ञान व बोधीवृक्ष हे भारताच्या इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणता येईल. भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाने जीवन सुखकर करता येत असल्याने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब जीवनात करावा. तसेच महाबोधिवृक्षाच्या रोपणाने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात या वृक्षारोपणच्या माध्यमातून झाली आहे, ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे, असेही डॉ.भारती पवार म्हणाल्या. तसेच छगन भुजबळ यांनीही आपल्या भाषणातून बुद्ध धम्माचे महत्त्व पटवून सांगितले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म का निवडला त्या मागचे त्यांचे विचार आणि आज भारत बुद्धमय होण्यासाठी आपण टाकलेले पाऊल यावर त्यांनी विवेचन केले.
कार्यक्रम प्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे जी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय मंत्री विदुर विक्रमनायके,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे,मलेशिया येथील महाथेरो संघराजा, पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो,भिक्खू नाराणपणावे, भिक्खू डॉ.पोंचाय, प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर,आमदार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, राहुल ढिकले,भिक्खू सुगत थेरो, संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त श्री.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, आनंद सोनवणे, प्रकाश लोंढे, रंजन ठाकरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, जात पडताळणी समिती अध्यक्ष गीतांजली बाविस्कर , बार्टी विभाग प्रमुख वृषाली शिंदे, जात पडताळणी उपायुक्त राकेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्यासह, बार्टी समतादुत टीम तसेच विविध विभागाचे अधिकारी, बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.