सासवड (प्रतिनिधि) या वर्षी कमी झालेला पावसाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहारातील बहुतांश सार्वजनिक नवरात्री मंडळे साध्या परंतु उत्साहाच्या वातावरणात शारदीय नवरात्रौत्सव साजरा करत आहेत. कोडीत नाक्यावरील छत्रपतीनवरात्र मंडळ, मुख्य बाजारपेठ रस्त्यांवरील तुळजा भवानी मंदिर, धान्य बाजारातील श्री दत्त मंडळ, बुरुड आळीतील शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळ, दळवी आळीतील गावची ग्राम देवता म्हणून परिचित असलेली महालक्ष्मी आईं मंदिर, बोरावके आळीतील सटवाई माता मंदिर, राऊत आळीतील तुकाई माता, सोपान नगर भागातील महालक्ष्मी मंदिर, हिवरकर मळ्यातील टाकमाई मंदिर,
म्हाडा कॉलनीतील महालक्ष्मी नवरात्री मंडळ, खंडोबा नगर येथील लमाण वस्तीतील देवी आदी ठिकाणीं सध्या नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरच्या तुळजाभवानी मंदिरात देवीला रोज वेगवेगळी अलंकारिक पुजा केली जात आहे अशी माहिती मधुबाला शामराव महाजन व प्रेरणा किशोर महाजन यांनी दिली.४७ वे वर्ष साजरे करणाऱ्या दत्त मंडळाने भजन, पुरंदर कलामंच च्या
ग्रुपचां संस्कृतिक कार्यक्रम व देवीला दररोज फुलांची सजावट करण्यात येतं असल्याचे सांगितले.कोडीत नाक्यावर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सासवडच्या सोपान नगर भागातील महिलांनी दुर्गा सप्तशती पाठ वाचन केले सोपान नगर येथील महालक्ष्मी नवरात्री उत्सव मंडळात काही स्थानिकांनी स्पीकरवर निर्बंध घातल्याने उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. शिव काळापुर्वी अगोदर उल्लेख आढळणाऱ्या टाकमाई मंदिर उत्सव समितीने येत्या शनिवारी भाविकांना महा प्रसादाचे आयोजन केले आहे. ध्वनीक्षेपकावरील गाणी,महिलांचा दांडिया, गोंधळ गीते, अष्टमीला होम हवन अशा स्वरूपात हा सोहळा सर्वत्र शांततेत पण उत्साहात साजरा केला जात आहे.