बार्टी च्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी Tata STRIVE मार्फत पुणे,नाशिक,नागपूर,ठाणे,मुंबई येथे मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
!!! दि. १९ ऑक्टोबर २०२३ पासून नाव नोंदणी करता येईल !!!
पुणे - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट (Tata STRIVE) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास विभागा मार्फत सन २०२३-२४ या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे असून त्या अनुषंगाने दिनांक ०४/०८/२०२३ रोजी मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला होता सदर सामंजस्य करारा अंतर्गत पुणे व पुणे (नऱ्हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बार्टी च्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी हि मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आहे .
प्रशिक्षणासाठी उपलब्ध कोर्सेस पुढील प्रमाने आहेत - Business Development Executive , Auto Sales Consultant , Customer Care Executive, Cyber Security ,Front Office Associate, Retail Sales Associates ,Assistant Electrician , Assistant Beauty Therapist (Only for females) , General Duty Assistant, Quick Service Restaurant Executive , Automotive Service Technician (2 -Wheeler),Automotive Service Technician (4-Wheeler),Food & Beverage Service - Steward, Housekeeping Operations , Field Technician AC ,Automotive Tele-Caller, UX Design, Field officer Agri ,Solar PV Installer , AC&R Operator (Central AC) .
रजिस्टर लिंक :- https://rb.gy/kra7b
नाव नोंदणी :- दि. १९ ऑक्टोबर २०२३ पासून
नाव नोंदणीची शेवटची तारीख :- ३१ ऑक्टोबर २०२३
प्रशिक्षणाचे इतर फायदे :-
इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण ,व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण , कंप्युटर व उद्योजकीय प्रशिक्षण ,मोफत प्रशिक्षण साहित्य 100% नोकरीसाठी सहाय्य
आवश्यक कागदपत्रे:
•जातीचा दाखला (Caste Certificate)
•आधार कार्ड
•शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशिट)
•शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (TC/LC)
•4 पासपोर्ट साईट फोटो
•मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
•रेशन कार्ड
•राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
प्रशिक्षणासाठी व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक .:- पुणे - 9920934096 , नाशिक - 8698411288 , पुणे नऱ्हे - 7770045454 , मुंबई - 75566611093 , तळोजा - 9920989450 , नागपूर - 9021204499 , ठाणे - 9920191648
“बार्टी” च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा व उपक्रमांचा लाभ समाजातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांनी केले आहे.