यावेळी बोलताना श्रीमती भोसले म्हणाल्या की ,
शाळेच्या बाहेर बसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक अडचणीवर मात करून शिक्षण घेतले त्यांनी देशाची राज्यघटना लिहिली आज संपूर्ण जगात त्यांच्या नावाचा गौरव केला जातो .
प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, कार्यालय अधिक्षक डॉ संध्या नारखडे, प्रज्ञा मोहिते, फिलोशीप विद्यार्थी प्रतिनिधी प्रदीप त्रिभवन यांनी विद्यार्थी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यालय अधिक्षक रितेश गोंडाणे, प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवते, नितिन सहारे, महेश गवई, डॉ सारिका थोरात, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले.
आभार डॉ अंकुश गायकवाड यांनी मानले.
बार्टीतर्फे प्रतापसिंह हायस्कूल , सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या मौल्यवान पुस्तकाचा स्टाॅल उपलब्ध करून देण्यात आला होता भारतीय राज्यघटना, अन्य पुस्तके अल्प दरात वितरण करण्यात आले याचा विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
समतादुत विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रॅली , काव्यवाचन , चर्चासत्र ,अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले.
यामध्ये समतादुत विभागातील प्रकल्प अधिकारी, समता दुत विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..