विजय भटकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’

 


पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुण्यभूषण पुरस्कारासाठी भटकर यांची निवड केली आहे. पुरस्काराचे ३६ वे वर्ष आहे. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून वाढवून दोन लाख रुपये केली आहे. याशिवाय सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि पुण्यभूषण स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यंदा या पुरस्कार सोहळ्यात सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.


Followers