सीईटीच्या तारखांत बदल


मुंबई : 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. यामध्ये पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी (पी अँड ओ) या सीईटीच्या परीक्षांचा समावेश असून या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार एमएचटी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरू होणार होती आणि ३० एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा २२ एप्रिलनंतर होणार आहे. पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल या तारखांना होणार आहे; तर पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे रोजी होणार आहे.

एएसी सीईटीची त्याच तारखेला म्हणजे १२ मे रोजीच होईल. बीए/बीएससी, बीएड (४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी २ मे रोजी होणार होती. ती आता १७ मे रोजी होणार आहे. एमएएचएलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा १७ मे रोजी होईल.

Followers