चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा शुभारंभ वाकडमधूनच करणार- शंकर जगताप

 


चिंचवड, (प्रतिनिधी) 

 - वाकड म्हातोबा देवस्थानच्या आशीर्वादाने आणि वाकडवासीयांच्या भरघोस पाठिंब्याने आपण नक्कीच निवडून येणार. त्यानंतर विकासकामांची सुरुवात वाकडच्या म्हातोबा देवस्थान पासूनच करणार, अशी ग्वाही चिंचवड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी दिले. वाकड गावात प्रचार दौऱ्यात म्हातोबा चरणी लीन होवून मनोभावे माथा टेकवून त्यांनी विजयासाठी आशीर्वाद घेतला. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली. तोच ध्यास घेवून येणाऱ्या काळात वाकडसह चिंचवड विधानसभेचा कायापालट करणार आल्याचे मत व्यक्त केले. उमेदवार शंकर जगताप यांनी मतदारांच्या गाठी-भेटी, प्रचारफेरीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

वाकड गावठाण पासून सुरु झालेल्या या दणदणीत प्रचारफेरीत त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक संदीप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, श्रीनिवास कलाटे, अमोल कलाटे,  युवा नेते राम वाकडकर, पिंपरी चिंचवड आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हाळकर, चेतन भुजबळ, बजरंग कलाटे, कालीदास कलाटे, रणजीत कलाटे, संतोष कलाटे, स्नेहा कलाटे, युवा नेते अक्षय कळमकर, धनराज बिर्दा, भारती विनोदे, नितीन इंगवले, गणेश कस्पटे, मुकेश कस्पटे, पियुशा पाटील, प्रसाद कस्पटे, किरण कलाटे, विक्रम कलाटे, विनोद कलाटे, संदीप वाकडकर, निखिल भंडारे, अमर भूमकर, सुरज भुजबळ, अभिमान कलाटे, अक्षय कलाटे, गणेश कळमकर, ऍड. अमोल भुजबळ, सतिश वालगुडे, ऍड. चेतन कलाटे स्वप्निल कलाटे, पंकज भंडारे, सनी कलाटे, योगेश भोसले, बाळा समिंदर, सुजित कांबळे, अविनाश शिरसाठ, सतिश राजे, सचिन लोंढे यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Followers